संपुर्ण मार्गदर्शन-जमिनीची गुणवत्ता पाहुन पिक सुचवण्यापासुन ते जागतिक बाजारपेठेत महत्वाचे स्थान उपलब्ध करून देणे.
More About Me
What You Need
सुमारे ३५ वर्षीचा शेतीतील अनुभव व, दिवसेंदिवस वाढणारा उत्पादन खर्च, व्यापार्यांकडून होणारी सततची पिळवणूक व आधुनिक काळातील ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी एकमेव पर्याय दिसतो तो म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी.
आज मी जवळपास १८०० एकर द्राक्ष बागांना मार्गदर्शन करतो, मग इकडे पारगाव ते राशिन व तिकडे पारगाव ते राहता-र्शिडी पर्यंत.
हे सर्व लोक माझ्यावर विश्वास ठेऊन मी लिहून दिलेले शेड्युल फॉलो करतात. परंतु हल्ली अलिकडच्या काळात आपना सर्वाचा उत्पादन खर्च हा खूप प्रमाणात वाढत चालला आहे. एक बाजू म्हणजे खंत, औषधे जी मी सांभाळतो व त्यात जितका होईल तितका जास्त फायदा त्या शेतकर्यांचा होईल याचा विचार मी व माझी सर्व टीम सतत करत असते. परंतु बाकीच्या अनेक गोष्टी आहेत जसे ESS स्प्रेअर मशिन, लेबर व इतर गोष्टी यांचा खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.इथेच आपला उत्पादन खर्च वाढतो. तसेच दर वर्षी व्यापार्यांने पैसे बुडवले, सैदा अर्धात सोडला, सैदा मार्केट रेट पेक्षा कमी भावाने झाला अश्या गोष्टी कानावर पडतात. आता तुम्हीच सांगा या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपनी आपला किती फायदा करून देऊ शकते.
जे सर्व लोक मला उत्तम प्रकारे अट्याच आहेत, अश्या या सर्वांना सोबत घेऊन मी एक मोठी सेना बनवू इच्छित आहे. मला तेच लोक हवे आहेत जे मला त्यांचे १००% देतील मग आपण नक्कीच सर्व काही साध्य करू जे आपल्याला करायचं आहे.
चला तर मग कोणताही विचार न करता या ठिणगी ला एकतीच्या ज्योतीत विलीन करूयात...

